
रेशनकार्ड मुळे मिळणाऱ्या स्वस्त अन्नधान्यामुळे देशातील कितीतरी लोक दोन वेळेचे अन्न खात आहेत. भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ( National Food Security Act) नागरिकांना प्रत्येक महिन्याला 2-3 रुपयामध्ये 5 किलो अन्नधान्य दिले जाते. इतकंच नाही तर अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या कुटुंबाना दर महिन्याला 35 किलोग्रॅम अन्नधान्य देण्यात येते. याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होतो. दरम्यान या लोकांसाठी सरकारने एक मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेशनकार्डधारकांना पुढच्या एक वर्षासाठी मोफत रेशन मिळणार आहे.
आनंदाची बातमी ! 30 हजार शिक्षकांची शिक्षक भरती होणार
येत्या 31 डिसेंबर रोजी संपणाऱ्या मोफत रेशनच्या योजनेला मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे पुढच्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहणार आहे. केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल ( Piyush Goyal) यांनी या निर्णयाबाबत मध्यमांना माहिती देत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत मोफत अन्नधान्य पुरविण्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे सांगितले. यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 2 लाख कोटींचा बोजा येणार आहे.
फिनोलेक्स कंपनीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांसोबत साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस
केंद्रसरकारच्या या योजनेमुळे आर्थिक दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेत वाटप होणाऱ्या अन्नधान्यासाठी लोकांना एक रुपया देखील द्यावा लागणार नाही. दरम्यान या सोबतच सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे.