
भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा काल पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांनंतर अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात
शरद पवार म्हणाले, रात्री उशिरा प्रवास करण शक्यतो टाळावे मी देखील हे टाळत नाही. मात्र याबद्दल मला माझे घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय काम करताना लोकांशी संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. पण त्याचबरोबर सुरक्षिततेचि देखील काळजी घ्यावी. असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
आनंदाची बातमी ! 30 हजार शिक्षकांची शिक्षक भरती होणार
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातीमधील फलटण तालुक्यातील मलटण गावच्या हद्दीमध्ये जवळपास ५० फुट खोल दरीत गाडी कोसळल्याने हा धक्कादायक अपघात झाला आहे. या अपघातावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे एकटे नसून त्यांच्यासोबत अजून चौघेजण देखील गाडीमध्ये होते. या अपघातात त्या चौघांना देखील गंभीर दुखापत झाली असून, लवकरात लवकर पोलीस मदत मिळाल्याने आमदार जयकुमार गोरे आणि त्या चौघांना लवकरात लवकर पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फिनोलेक्स कंपनीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांसोबत साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस
अपघात नेमका कसा झाला याची पोलीस यंत्रणा तपास करत असून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाची याबाबतची पाहणी देखील केली आहे. आमदार जयकुमार गोरे हे फलटणहुन माणच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे.