नागपूर येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन विविध मुद्यांनी गाजत आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी नुकतेच जोरदार भाषण केले. भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढत जोरदार टोलेबाजी केली. राज्यात विविध कामांना दिलेल्या स्थगिती वरून व रखडलेल्या कामावरुन त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. अधिवेशनात बोलताना अजित पवारांनी विदर्भ, मराठवाडा या भागाबद्दल व शेतकऱ्यांबद्दल अनेक मुद्दे मांडले.
अक्षय कुमारने महिलांना दिले स्वसंरक्षणाचे धडे; कार्यक्रम सुरू असताना अचानक महिला ओरडू लागली!
” देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) हे भाजपच्या नेत्यांमध्ये सर्वात ताकदवान आहेत. कोणी कितीही गप्पा मारल्या तरी जे आहे ते आहे. तसेच त्यांनी काही इतर लोकांना देखील संधी दिली आहे. विधिमंडळाचे देखील सदस्य (चंद्रशेखर बावनकुळे) आहेत. महाविकास आघाडी सरकारने विदर्भ, मराठवाड्यासाठी काहीच केलं नाही, असे चित्र त्यांनी निर्माण केले आहे. मात्र कितीही टीका झाली तरी सर्व विभागांमध्ये आम्ही काम केले,” असे म्हणत अजित पवार यांनी भाषणादरम्यान भाजप नेत्यांचे चांगलेच कान टोचले आहेत.
गायरान जमीन हक्कासाठी आंदोलन; ‘या’ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली
यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले की, “ यावर्षी सप्टेंबर महिन्यात आपले नेते (चंद्रशेखर बावनकुळे) बारामतीत आले. तेव्हा ते म्हणाले बारामतीत घड्याळ बंद करण्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार. बारामतीमध्ये आमचे काम आहे, पण खरचं तिथे करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल. अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मी एकदा कुणाला चॅलेंज दिले ना तर कुणाचे ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही.”
अक्षय कुमारने महिलांना दिले स्वसंरक्षणाचे धडे; कार्यक्रम सुरू असताना अचानक महिला ओरडू लागली!