अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांना चांगलेच सुनावले. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस बदलले आहेत, त्यांनी राजकारणातील ( Politics) नैतिक पातळी राखली पाहिजे. असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
अर्रर्रर्र! वासोट्याला जायचा प्लॅन कॅन्सल करावा लागणार; पुढील तीन दिवस किल्ल्यावर पर्यटकांना बंदी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांनी विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला होता. मात्र, आज सत्तेत बसल्यावर त्यांना विरोधी पक्षाने केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहे. फडणवीस एवढे का बदलले आहेत ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच अधिवेशन अजून संपलेले नसून आमच्याकडे अजूनही वाती तयार आहेत. असे म्हणत राऊतांनी इशारा दिला आहे.
गायरान जमीन हक्कासाठी आंदोलन; ‘या’ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली
सध्या राजकारणातील नैतिक पातळी राखण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले पाहिजे. फडणवीस स्वतःहून भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम करत नसतील. त्यांची देखील काहीतरी मजबूरी असेल, शेवटी हे सरकार त्यांच्यावर लादलेले सरकार आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे. असे म्हणत राऊतांनी फडणवीस यांना टोला मारला आहे. तसेच सीमा प्रश्नावरचा ठरावावरून बोलताना ते म्हणाले की, “हा ठरावअत्यंत महत्वाचा आहे. मात्र ज्याप्रकारे ठराव तयार केला तो अतिशय भुलसट आहे. त्यामध्ये संपूर्ण प्रदेश केंद्र शासित करावा याचा उल्लेख नाही.”
अजित पवार कडाडले! म्हणाले; “त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायला…”