शेतात काम करताना अपघात किंवा जंगली प्राण्यांकडून हल्ला होण्याच्या घटना अनेकदा घडतात. बुलढाणा येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी शेतात काम करत असताना अस्वलाने हल्ला केल्याने युवाशेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी ( दि.28) ही घटना घडली. डोंगरशेवली येथे ही घटना घडली असून जखमी शेतकऱ्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात (Buldhana District General Hospital) उपचार सुरू आहेत.
गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण देण्याची मागणी; राज्यात ठीकठिकाणी निदर्शने!
राहुल राम भुतेकर (२२, रा. डोंगर शेवली, ता. चिखली) या युवकावर हा हल्ला झाला आहे. त्याच झालं असं की, काल सकाळी ११ वाजता राहुल आपल्या शेतात नेहमीचे काम करत होता. हे शेत डोंगरशेवली-किन्होळा रोडवर आहे. यावेळी शेतातच दबा धरून बसलेल्या एका अस्वलाने ( Bear ) त्याच्यावर अचानक हल्ला केला. दरम्यान आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला.
फडणवीस एवढे का बदलले आहेत? संजय राऊतांनी उपस्थित केला प्रश्न
हा आरडाओरडा ऐकून अस्वल पळून गेले. त्यामुळे राहुल थोडक्यात बचावला. मात्र या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याआधीही मंगळवारी ( दि.27) चिखली ( Chikhali) येथील मुर्दापुर येथे अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.
अजित पवार कडाडले! म्हणाले; “त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायला…”