राज्यात एकीकडे काही कारख्यान्यांमध्ये गाळप हंगाम जोमात सुरू आहे तर दुसरीकडे काही कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हे कारखाने बंद पडू नये यासाठी आता शेतकरी देखील मैदानात उतरले आहेत. कुमठे येथील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास प्रदूषण मंडळाने दिलेली नोटीस मागे घ्यावी, यासाठी तेथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र प्रशासनाने अजूनही याची कोणतीही दखल घेतलेली नाही.
ब्रेकिंग! नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळची व्यक्ती रुग्णालयात दाखल
मागील एक महिन्यापासून सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बंद पडू नये यासाठी आंदोलन सुरू आहे. याची प्रशासनाने दखल न घेतल्याने सिध्देश्वर राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे ( Worker’s Union ) अशोक बिराजदार व कारखान्याचे शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे यांनी चक्क आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या कारखान्याविरुध्दच्या सर्व नोटिसा मागे घेण्याची मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिले असून या पत्राची सर्वत्र चर्चा आहे.
मोठी बातमी! भीमा पाटसचे फक्त 8 दिवसात 19 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप
त्याच झालंय असं की, होटगी रोड विमानतळाच्या 15 नंबर धावपट्टीवरून विमानसेवा सुरू करायची असल्यामुळे हा कारखाना बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. मात्र यामुळे कारखान्यातील कामगार, शेतकरी व इतर सभासद चांगलेच अडचणीत येणार आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी व कारखान्याच्या सभासदांनी ‘कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळाच्या 15 नंबर धावपट्टीवरून विमानसेवा सुरू करा.’ अशी मागणी करत कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात आंदोलन सुरू केले आहे.
मोठी बातमी! शेतात काम करत असताना शेतकऱ्यावर अस्वलाने केला हल्ला