जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय!

Do 'this' natural remedy to increase animal milk!

शेतकऱ्यांना फक्त शेती करून हवा तसा मोबदला मिळत नाही. त्यामुळे बहुतेक शेतकरी शेती व्यवसायासोबतच आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून पशुपालन करतात. यामधून त्यांना आर्थिक फायदा देखील होतो. इतकच नाही तर सरकारही पशुपालन व्यवसायासाठी विविध अनुदाने व योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करतात. हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यातील मुख्य अडचण म्हणजे गायी व म्हशींचे दूध कमी येणे. याचा परिणाम म्हणून दुग्धउत्पादनात घट होताना दिसून येते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

मोठी बातमी! भीमा पाटसचे फक्त 8 दिवसात 19 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप

गायी म्हशींचे दूध वाढवण्यासाठी ( milk growth) बऱ्याचदा इंजेक्शन किंवा विविध प्रकारची औषधे दिली जातात. परंतु, यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय असे दूध सेवन करणे सुद्धा ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी नैसर्गिक उपाय ( Natural remedies) करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र

जनावरांमध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे त्यांना संतुलित आहार देणे. यामध्ये पशुपालकांनी मुख्यतः चाऱ्यातील मका, बार्ली, गहू, बाजरी हे पूर्वीच्या तुलनेत वाढवावे. याशिवाय जनावरांच्या केकमध्ये मस्टर्ड केक, शेंगदाणा केक, कापूस पेंड, जवसाचे पेंड यांचे प्रमाण वाढवा. तसेच जनावरांना भरपूर पाणी प्यायला द्यावे व मोहरीचे तेल गव्हाच्या पिठात मिसळून खायला द्यावे.

ब्रेकिंग! नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळची व्यक्ती रुग्णालयात दाखल

जनावरांचे दूध वाढवायचा सोप्पा उपाय म्हणजे चवळीचे गवत. हे गवत खाल्ल्याने जनावरांचे दूध वाढते. खरंतर चवळीचे गवत हे इतर गवतांपेक्षा अधिक पचणारे असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि फायबर असतात. यांचा उपयोग दुग्धजन्य प्राण्यांना होतो. या कारणांमुळे चवळीचे गवत खाल्ल्याने जनावरांचे दूध वाढते. चवळीच्या गवताने गायी व म्हशींना कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही.

मोठी बातमी! शेतात काम करत असताना शेतकऱ्यावर अस्वलाने केला हल्ला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *