राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात सुरू असणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Briged) रौप्य महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत आपली मते व्यक्त केली. दरम्यान नव्या पिढीचं अर्थकारण व आरक्षण या विषयावर देखील शरद पवार ( Sharad Pawar) बोलले आहेत.
पोलिसांसमोर मुलाने गायले गाणे आणि पुढे घडलं असं की…”, पाहा VIDEO
संभाजी बिग्रेडच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात शरद पवारांनी आरक्षण, शेतकरी आणि मराठा समाज या विषयांवर भाष्य केले. “संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी संघर्ष केला, विविध मागण्या केल्या. परंतु, आता आरक्षण-आरक्षण बस झालं, नव्या पिढीचं अर्थकारण जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही,” असं सूचक विधान शरद पवारांनी या कार्यक्रमात केले आहे.
पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही! राज ठाकरेंचे मोठे विधान…
याशिवाय संभाजी बिग्रेडचे कौतुक करत शरद पवार म्हणाले की, “बोलता-बोलता या संघटनेला २५ वर्षे पूर्ण झाली आणि आज आपण रौप्य महोत्सव साजरा करत आहोत. प्रवीण गायकवाड यांनी पक्ष हातात घेतल्यानंतर, पक्षाचा विस्तार कसा वाढेल ? याची काळजी घेतली. त्यांनी नव्या पिढीची शक्ती पक्षाभोवती उभी केली. सोबतच त्यांनी संघटना म्हणून आज पक्षाने कोणत्या रस्त्याने जायला हवंय, याची चिकित्सा करून पक्षाला योग्य वळणावर नेण्याची खबरदारी त्यांनी घेतली. याचा मला मनापासून आनंद आहे.”
‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने राज ठाकरे यांना मारण्याचा रचला होता कट