भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्येच आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ऋषभ पंत याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
मोठी बातमी! भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात
ट्विट करत त्यांनी लिहिले की, “माझे विचार आणि प्रार्थना ऋषभ पंतच्या पाठीशी आहेत कारण तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर संघर्ष करत आहे. मी त्याच्या कुटुंबीयांशी आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो आहे. ऋषभची प्रकृती स्थिर असून त्याची तपासणी सुरू आहे. आम्ही त्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ”. असे ट्विट त्यांनी केले आहे.
जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या ऋषभ पंतचा अपघातांनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर; पाहा VIDEO
My thoughts and prayers are with Rishabh Pant as he fights his way back to recovery. I have spoken to his family and the doctors treating him. Rishabh is stable and undergoing scans. We are closely monitoring his progress and will provide him with all the necessary support.
— Jay Shah (@JayShah) December 30, 2022
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे. माहितीनुसार, या अपघातामध्ये ऋषभच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील केली जाणार आहे.