क्रिकेटर सचिन तेंडुलकर आजही लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. चाहते अजूनही त्याच्याबद्दल वेगेवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. सध्या सचिन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर चुलीवरच्या स्वयंपाकाची चव घेताना दिसतोय.
ऋषभ पंतन स्वतः सांगितला अपघात नेमका कसा झाला? म्हणाला…
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) वरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत सचिन चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांशी देखील संवाद साधताना दिसत आहे.
क्रिकेटर पंतच्या अपघातानांतर का भडकली रोहित शर्माची पत्नी?
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. आत्तापर्यंत या व्हिडिओला ६ लाख ६८ हजारांपेक्षा जास्त लाईक आले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, सचिन यांना असचं क्रिकेटचा भगवान म्हटलं जात नाही. त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. असं युजरने म्हंटल आहे.