मृत्यु हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो. मृत्यु हे माणसाच्या आयुष्यातील शाश्वत सत्य म्हणून ओळखले जाते. माणूस आयुष्यभर स्वतः व आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रचंड पैसा व प्रसिद्धी कमावण्याच्या पाठी लागतो. मात्र मृत्यु ( Death) होताना तो रिकाम्या हाती जातो. म्हणतात ना, आयुष्यभर कितीही पैसा कमवा पण मेल्यानंतर जमलेली माणसं हीच खरी संपत्ती.
सचिन तेंडुलकर यांनी घेतला चुलीवरील स्वयंपाकाचा आस्वाद; पाहा VIDEO
असो ! माणूस मेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेत राम नाम सत्य है असे म्हंटले जाते. हे असे का म्हंटले जाते तुम्हाला माहित आहे का ? त्याच असं आहे की, हिंदू धर्मानुसार, जेव्हा एखादा मनुष्य त्याच्या आयुष्यातील अगदी शेवटचा क्षण जगत असतो, तेव्हा तो राम ( Ram) नामाचा जप करतो. कारण, रामनामाचा जप केल्यानेच जीवनात मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात.
ऋषभ पंतन स्वतः सांगितला अपघात नेमका कसा झाला? म्हणाला…
खरंतर प्रचलित कथांनुसार रामायणातसुद्धा राजा दशरथाने शेवटच्या क्षणी राम-राम म्हणत मोक्ष मिळवला होता. हिंदू शास्त्रानुसार मरताना राम नामाचा जप केल्यास तुमचा त्रास कमी होतो. शेवटी इतकंच की, आयुष्यभर माणूस संपत्ती, सन्मान यासाठीकितीही खटपट करत राहिला तरी शेवट हा रामानेच होतो.
ऋषभ पंत पुन्हा क्रिकेट खेळू शकणार का?
महाभारतात ( Mahabharat) धर्मराज युधिष्ठिरांनी देखील या संबंधित एका श्लोकाचे विवेचन केले आहे. ‘ अहन्याहणी भूतानि गच्छन्ति यम्ममंदिरम् ।
शेषा विभूतिमिछन्ति किमश्चर्या मत: परम् ।
याचा अर्थ सांगताना ते म्हणतात की, ” प्रेत वाहून नेत असताना लोक रामाचे नाव घेतात तेव्हा मृत व्यक्तीसोबत फक्त रामाचे नाव जाते. परंतु, अंत्ययात्रेवरून परत आल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य त्या व्यक्तीच्या संपत्ती आणि मालमत्तेबद्दल विचार करू लागतात. लोक त्यावर भांडू लागतात. व्यक्ती आयुष्यातून निघून गेला की घरच्यांना त्याची संपत्ती हवी असते. त्यामुळे माणसाने लोभी न राहता चांगले कृत्य करायला हवे.