मुंबई: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहेत. आता या चर्चाना पूर्णविराम भेटला असून अभिनेत्री कियारा आडवाणी आणि मल्होत्राची लग्नाची तारीख आणि ठिकाण फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे.
पंतच्या अपघातानंतर दिनेश कार्तिकने सर्वांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला…
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Siddharth Malhotra and actress Kiara Advani) हे 6 फेब्रुवारीला लग्न बंधणात अडकणार असून राजस्थानमध्येच शाही थाटामध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पंतच्या अपघातानंतर दिनेश कार्तिकने सर्वांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला…
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या आधीचे मेहंदी, हळद, संगीत हे सर्व कार्यक्रम ४ आणि ५ फेब्रुवारीला होणार आहेत. यांच्या लग्न सोहळ्यासाठी जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित असणार आहे.
अंबानी कुटुंबातील छोटी सुनबाई राधिका नक्की कोण आहे? जाणून घ्या अधिक…