आज 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस. या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी एक भावुक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, महाराष्ट्रातील तमाम बंधू – भगिनींनो, गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले #२०२२ हे वर्ष आता सरत आलंय, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवत येणारे #२०२३ साल आपल्याला खूणावत आहे. आपण सर्वजण येणाऱ्या नवीन वर्षात नवी स्वप्ने, नवी आशा, नव्या आकांक्षा, नवे संकल्प, नवी दिशा उरात बाळगून आहोत.
ठरलं! ‘या’ तारखेला कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा करणार लग्न
परंतू, नववर्षाचे स्वागत करताना आपल्या उत्साहाचा, कृतीचा, आचाराचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणालाही त्रास होणार नाही याची एक सुज्ञ व सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस तसेच इतर सरकारी यंत्रणा त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे बजावतील यात मला तीळमात्र शंका नाही. आपण सर्वांनी सुद्धा त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
सावधान! उजणीचे पाणी झाले आहे विषारी; शेतीसोबत जनावरे व माणसांना धोका…
चला तर मग, आपण सर्वजण मिळून सरणाऱ्या २०२२ सालास निरोप देत येणाऱ्या २०२३ या नववर्षाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करूया….अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आहे.
पंतच्या अपघातानंतर दिनेश कार्तिकने सर्वांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला…