संजय राऊत यांचे मोठे भाकीत; नवीन वर्षात सरकार घरी बसणार?

Big prediction by Sanjay Raut; Will the government sit at home in the new year?

राज्यात सध्या सर्वत्रच नवीन वर्षाचे जोमात स्वागत केले जात आहे. दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नवीन भाकीत केले आहे. मूळ शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्याचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. यामध्ये सर्व गोष्टी कायद्याने झाल्या तर हे आमदार अपात्र ठरतील व शिंदे- फडणवीस सरकार घरी बसेल असे भाकीत संजय राऊत यांनी केले आहे.

बोगस रेशनकार्ड बनवणे पडले महागात; पोलिसांत गुन्हा दाखल…

काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी सत्तेसाठी शिवसेनेतून 40 आमदार फोडून भाजपचे बोट धरले व राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन केले. यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले. हा राजकीय बळजोरीचा प्रकार आहे. तसेच यामुळे मावळत्या वर्षात महाराष्ट्राने ( Maharashtra Politics) एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

‘वेड’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

भारतीय घटनेचा व लोकशाहीचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे लोक देशाला अराजकतेकडे ढकलत आहेत. नव्या वर्षात राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी जाऊन राज्यात व देशात काहीतरी प्रेरणादायी घडावे अशा अपेक्षेत राज्यातील लोक आहेत. तसेच हे वर्ष सर्वांसाठी आशादायी ठरेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर; कोण होणार विकेटकीपर?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *