यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) विरोधी पक्षात असले तरी ते चांगलेच गाजले आहेत. दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना यावेळी सत्ताधारी पक्षाकडून लक्ष्य करण्यात आले होते. दरम्यान नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या भविष्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे सुप्रसिद्ध ज्योतिषांकडून करण्यात आले आहेत. अगामी वर्ष आदित्य ठाकरे यांच्यासाठी कशा प्रकारचे असणार आहे. याबद्दल देखील या ज्योतिषांनी सांगितले आहे.
शिंदे-ठाकरे एकत्र येणार?, शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा मोठा खुलासा
महर्षी पंचायतन सिद्धीपीठम् चे अधिपती महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी नुकतेच आदित्य ठाकरे यांच्या भविष्याबद्दल महत्त्वाचे खुलासे केले आहेत. येत्या नवीन वर्षात आदित्य ठाकरेंच्या आयुष्यात शुभमंगल घटना घडणार असून यंदाच्या वर्षी विवाह ( Marriage time for Aaditya Thackeray) योग सुद्धा जुळून येऊ शकतो. मात्र यासाठी त्यांच्या आयुष्यातील ग्रह पालट होणे देखील तितकेच आवश्यक आहे.
शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस
मकर संक्रांतीपासून आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यात अरिष्ट चाहूल आहे. एप्रिल पर्यंत ही अशीच परिस्थिती असणार आहे. मात्र शनि व गुरू ग्रहपालट होताच आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यात शुभ संकेत प्राप्त होणार आहेत. महंत अनिकेतशस्त्री यांच्या सांगण्यानुसार खरंच आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा योग जुळून आला तर ठाकरे घरात यंदाच्या वर्षी सनई चौघडा वाजणार आहे.