ठाकरे कुटुंब सध्या एकामागोमाग एक येणाऱ्या संकटांचा सामना करत आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व सामना च्या संपादिका रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somyya) यांनी अलिबाग येथील 19 बंगल्यांच्या प्रकरणी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रश्मी ठाकरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.
गूगलवर चुकूनसुद्धा सर्च करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा खाल जेलची हवा
महाराष्ट्रातील सरकार बदलताच किरीट सोमय्या पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ऍक्टिव्ह झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अलिबागच्या कोर्लई गावात 19 बंगले घेतले होते. मात्र निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात हे बंगले त्यांनी लपवले. यानंतर घोटाळा दाबण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर करुन बंगले पाडले आहेत. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“…म्हणून चंद्रकांत पाटील भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यास अनुपस्थित”
2009 मध्ये कोर्लई गावात अन्वय नाईकांनी रिसॉर्टसाठी बंगले बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही जमीन रश्मी उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकरांनी खरेदी केली. मात्र सध्या प्रत्यक्षात कोर्लई गावात ते 19 बंगले नाहीत, तर घरांचा पाया किंवा पाडकामाचे अवशेष आहेत. अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून येत्या 8 दिवसांत याबाबत अहवाल येणार आहे.
ठाकरेंच्या घरात सनई चौघडा वाजणार; आदित्य ठाकरेंचं ‘या’ वर्षी लग्न होणार?