लग्नात लावलेल्या फटाक्यांमुळे आग लागून शेतात लाखोंचे नुकसान झाल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे. यामध्ये पाच शेतकऱ्यांचा ऊस जळाला असून तब्बल 6 लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात देखील नोंद करण्यात आली आहे.
भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन करणारा देश – शरद पवार
औरंगाबाद (Aurangabad) मधील वाळूज येथील लिंबेजळगाव येथे एका लग्नात फटाक्यांची आतषबाजी करणे चांगलेच महागात पडले आहे. या फटाक्यांमुळे जवळच असणाऱ्या जवळपास दहा एकर उसाच्या (Sugarcan) शेतीला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले,”त्यांच्या सारख्या नेत्यांनी असे बोलणे…”
चंद्रशेखर त्रिंबक आलोने, सुरेश त्रिंबक आलोने, अवंतिका त्रिंबक आलोने, दत्तात्रय हरिभाऊ आलोने, सुलेमान मोहम्मद खान या शेतकऱ्यांच्या शेतातील हा ऊस आहे. दरम्यान आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलविण्यात आले होते.
पिंपरी विकास कामाकडे पिंपरी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
शेताजवळच मंगल कार्यालय असल्याने ही घटना घडली आहे. नुकसान झालेल्या शेतातील काही ऊस तुटून कारखान्याला गेला होता. तर काही ऊस बेणे म्हणून लावण्यासाठी तसाच उभा होता. या घटनेत उभा असलेला ऊस व ठिबकच्या पाईप मिळून 6 लाखांचे नुकसान झाले आहे.
‘त्या’ 19 बंगल्यांमुळे रश्मी ठाकरे गोत्यात! किरीट सोमय्या यांनी पोलिसांत दिली तक्रार…