बहुचर्चित वेड (Ved Movie) या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया डिसूझा ही जोडी प्रचंड चर्चेत आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाने मोठा गल्ला जमवला असून हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतोय. ‘वेड’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रितेश व जेनेलिया त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक खुलासे करत आहेत. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलांचे किस्से देखील सांगितले आहेत.
भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन करणारा देश – शरद पवार
प्रमोशनच्या वेळी एका मुलाखतीमध्ये रितेशला ( Ritesh Deshmukh) विचारण्यात आले की, त्याच्या मुलांवर चित्रपटांचा काय परिणाम होतो याचा विचार तुम्ही करता का? यावर उत्तर देताना रितेशने मोठा खुलासा केला आहे. चित्रपटामधील रितेशचा लूक पाहून त्याच्या मुलांनी त्याला तुमच्या तोंडामध्ये काय आहे. तसेच सिगारेट म्हणजे काय? असे विचारले होते. आम्ही लोकांच्या तोंडामध्ये हे अनेकदा पाहिले असे देखील मुलांनी रितेश ला सांगितले.
एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले,”त्यांच्या सारख्या नेत्यांनी असे बोलणे…”
यावेळी मुलांना उत्तर देताना रितेशने सिगारेट आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगितले होते. तसेच यावेळी त्याने आपण हे काही करत नाही, असेही म्हंटले होते. रितेश व जेनेलिया दोघेही सिगारेट व दारू पीत नाहीत. अशी माहिती सुद्धा त्यांनी मुलाखती दरम्यान दिली आहे. बॉलिवूड मध्ये आदर्श कपल ( Ideal Couple) म्हणून प्रसिद्ध असलेली ही जोडी आदर्श पालक देखील आहे. कारण या दोघांनी देखील आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार केले आहेत.
लग्नात फटाके वाजवणे पडले महागात; ऊसाला आग लागून लाखोंचे नुकसान!