नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यामुळे भाजपने अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून भाजपच्या विविध नेत्यांनी त्यांना धारेवर धरले आहे.
अभिनेता रितेश देशमुखचा मोठा खुलासा; म्हणाला,”आम्ही दोघेही सिगारेट…”
अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने बालपुरस्कार देण्याबाबत अजित पवार ( Ajit Pawar) सभागृहात भूमिका मांडत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “आपण संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतो. परंतु, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे.”
लग्नात फटाके वाजवणे पडले महागात; ऊसाला आग लागून लाखोंचे नुकसान!
यामुळे भाजप ( BJP) नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नरेंद्र पवार यांनी अजित पवार यांची रवानगी पाकिस्तानात करा. अशी मागणी केली आहे. “अजित पवारांना छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर म्हणून मान्य नसतील तर त्यांची रवानगी पाकिस्तानात करण्यात यावी”. असे ते म्हणाले आहेत.
आर्चीच्या ‘त्या’ लुकची चर्चा; लोक म्हणाले, “एवढा पैसा आलाय तर…”
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे ( Rupali Thombre) यांनी नरेंद्र पवार यांना प्रतिउत्तर दिले आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्या केले तसेच भाजपच्या इतर नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला होता तेव्हा तुमची जीभ छाटली होती का ? असा प्रश्न रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.