राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या- मोठ्या नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जात आहे. आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, नंतर चंद्रकांत पाटील आणि आता विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) देखील चुकीची व आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांच्या ओळीत बसले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Aavhad) यांनी देखील औरंगजेब हिंदुद्वेष्टा न्हवता असे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.
आर्चीच्या ‘त्या’ लुकची चर्चा; लोक म्हणाले, “एवढा पैसा आलाय तर…”
यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे ( बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांना धारेवर धरले आहे. सोबतच त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात. असा गंभीर आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे असून जितेंद्र आव्हाड आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उद्घघाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावं असे नरेश म्हस्के ( Naresh Mhaske) यांनी म्हंटले आहे.
अभिनेता रितेश देशमुखचा मोठा खुलासा; म्हणाला,”आम्ही दोघेही सिगारेट…”
याशिवाय नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) पक्षावर देखील चांगलेच ताशेरे ओढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम हिंदू धर्माचा आणि हिंदू धर्मातील तत्त्वांचा अपमान केला जातो. असे अनेकदा त्यांच्याकडून घडले आहे. त्रास होऊन देखील छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, त्याऐवजी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मग त्यांना धर्मवीर का म्हणायचं नाही? असा प्रश्न उपस्थित करत नरेश म्हस्के यांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे.
लग्नात फटाके वाजवणे पडले महागात; ऊसाला आग लागून लाखोंचे नुकसान!