महाराष्ट्रात गौतमी पाटीलला ओळखत नाही, असे कोणी शोधूनही सापडणार नाही. मागच्या काही दिवसांत लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात केला जातोय. याशिवाय गौतमीच्या कार्यक्रमात चुकीच्या घटना वारंवार घडत असल्याने तिचे कार्यक्रम बंद करण्यात यावेत अशी मागणी विविध संघटना व लावणी कलाकारांकडून सतत करण्यात येत आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा वर्ल्डकप जिंकवून देणार नाहीत ; कपिल देव यांचे गंभीर विधान
हीच गौतमी पाटील आता आणखी एका वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या लावणीच्या तालावर अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गौतमीला (Gautami Patil)
लावण्यांच्या कार्यक्रमांमध्ये पाहण्यासाठी लोक अगदी वेडे होतात. आता तर ती चित्रपटात दिसणार या बातमीनेच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
सोलापूरातील हॉटेल चालकाची अनोखी शक्कल ! गौतमी पाटील च्या नावाने सुरू केली थाळी
‘घुंगरू’ (Ghungru movie) या मराठी चित्रपटातून गौतमी पाटील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. माढा, सोलापूर, हंपी आणि थायलंड या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले आहे. या चित्रपटाचे लेखन व निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे . या चित्रपटात बाबा गायकवाड हे गौतमी सोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. लोककलावंतांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असणार आहे.
बीसीसीआयला नवीन धक्का; भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत अचानक झाला ‘हा’ बदल!