
‘वेड’ या चित्रपटामुळे अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) व जेनेलिया डिसूझा हे बॉलिवूड मधील आदर्श कपल चर्चेत आले आहे. वेड ( Ved) या चित्रपटाने अवघ्या दोन-तीन दिवसांतच मोठी कमाई देखील केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशमुख जोडी ( Deshmukh Couple) विविध ठिकाणी मुलाखत देत आहेत. दरम्यान या दोघांच्या वागण्या बोलण्यात कायम संस्कार दिसून येतात. असेच संस्कार त्यांनी त्यांच्या मुलांवर देखील केले आहेत.
गौतमी पाटीलचा येणार चित्रपट; या अभिनेत्या सोबत असणार मुख्य भूमिकेत
एका मुलाखती दरम्यान रितेशला त्याच्या सर्वांनाच आदरपूर्वक आहो-जाहो बोलण्यावरून विचारले होते, यावेळी त्याने मोठा खुलासा केला आहे. यावर उत्तर देताना रितेशने सांगितले आहे की, मी फक्त माझ्या आईलाच एकेरी हाक मारतो. त्याच्या लहान मुलांपासून ते घरातील मोठयांपर्यंत सर्वांनाच तो ‘तुम्ही’ असे आदरपूर्वक बोलतो. ही त्यांच्या घराची परंपरा आहे. त्याचे काका व आजोबा देखील त्याला अजूनही ‘तुम्ही’ असेच म्हणतात.
विराट कोहली आणि रोहित शर्मा वर्ल्डकप जिंकवून देणार नाहीत ; कपिल देव यांचे गंभीर विधान
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रितेश त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलियाला सुद्धा ‘तुम्ही’ म्हणतो. अशी माहिती यावेळी रितेशने दिली आहे. या मुलाखतीमध्ये रितेशने त्याच्या आईला एकेरी हाक मारण्याबाबत खुलासा केला आहे. माझी आई ही माझ्यासाठी देवासारखी असून आमच्या इथे देवांना एकेरी संबोधले जाते. त्यामुळे मी माझ्या आईला एकेरी हाक मारतो.
सोलापूरातील हॉटेल चालकाची अनोखी शक्कल ! गौतमी पाटील च्या नावाने सुरू केली थाळी