महावितरणचे (MSEB) खासगीकरण होणार असल्याच्या चर्चा राज्यात सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरण, महाजनको आणि महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचारी संपावर गेले होते. थोड्या नाही तर जवळपास ३२ संघटनांच्या दीड लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल तीन दिवसांचा संप पुकारला होता. दरम्यान या संघटनांशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बैठक बोलावली होती.
मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम ! होतो लाखो रुपयांचा फायदा
या बैठकीसाठी महावितरण, महाजनको, महापारेषण या तीनही सरकारी कंपन्यांतील अधिकृत कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपन्यांचे खासगीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. “या तिन्ही कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण (Privatization) होणार नाही. मात्र पुढच्या तीन वर्षांत या तीनही कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. “असेहीं ते यावेळी म्हणाले.
म्हणून रितेश आईला एकेरी हाक मारतो ; रितेशचा हा खुलासा वाचून तुम्हीही व्हाल थक्क !
ओडिशा व दिल्ली या राज्यात या कंपन्यांचे खासगीकरण झाले आहे. मात्र महाराष्ट्रात अशा प्रकारचे खासगीकरण करण्याचा कोणताही विचार नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. याशिवाय समांतर खासगी परवाने देण्याबद्दल बोलताना, समांतर परवाने पद्धतीला विरोध केला आहे. संघटना व सरकार यांच्यात आधीच बैठक झाली असती, तर कोणतेच गैरसमज झाले नसते. असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
गौतमी पाटीलचा येणार चित्रपट; या अभिनेत्या सोबत असणार मुख्य भूमिकेत