कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली साताऱ्यातील रयत शिक्षण संस्था दिवसेंदिवस पसरत आहे. देशातील सर्वात महत्त्वाची संस्था म्हणून या संस्थेचे नाव झाले आहे. दरम्यान या संस्थेत आता आर्टीफिशियल इंटेलिजन्स देखील शिकवले जाणार असून त्यासाठी जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आयबीएमशी ( IBM) करार करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी दिली आहे.
2024 च्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून कर्जत-जामखेड मध्ये लागली एक लाखाची पैज!
शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त व रयत शिक्षण संस्थेतील ( Rayat Educational Trust) त्यांच्या 50 वर्षांच्या सक्रिय योगदानाबद्दल सातारा येथे कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे तर खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी आयबीएम सोबतच्या कराराबद्दल माहिती दिली आहे.
करीना कपूर मराठीत बोलते तेव्हा…! ‘हा’ व्हिडीओ एकदा बघाच
आजकाल जगातील बदलांची नोंद घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी रयत शिक्षण संस्था आयबीएमसोबत करार करून कृत्रीम बुद्धीमत्तेचे ज्ञान देण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. दहावी, बारावी तसेच पदवीधर होत असताना विद्यार्थी हा विषय घेऊ शकतात. या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न केला जाणार आहे. असे शरद पवार यावेळी म्हणाले.
2024 च्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून कर्जत-जामखेड मध्ये लागली एक लाखाची पैज!