उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुले कायम चर्चेत असते. यामुळे तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकही होते, मात्र त्याहून जास्त वेळा तिला टीकांना सामोरे जावे लागते. दरम्यान भाजप ( BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आता उर्फीला तिच्या फॅशन सेन्स वरून चांगलेच सुनावले आहे. उर्फी जावेदचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तिच्या अटकेची मागणी केली आहे.
शी…SSSS, अरे… हे काय चालले आहे मुंबईमध्ये ? सार्वजनिक ठिकाणी ही बाई नंगटपणा करत असून तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? हिला तात्काळ बेड्या ठोका. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवत आहे’. असं ट्विट करत चित्र वाघ यांनी उर्फी जावेदवर निशाणा साधलाय. मात्र, मात्र उर्फी शांत न बसता ती देखील यावर प्रतिक्रिया देत आहे.
Can’t wait to be best friends with @ChitraKWagh after I join bjp . Remember Sanjay Chitra ji ? Aapke bjp join karne k baad Aapki toh badi dosti ho gyi thi k aap unki Saari galtiya bhool gyi thi jiske liye ncp me itna halla kiya tha!
— Uorfi (@uorfi_) January 3, 2023
करीना कपूर मराठीत बोलते तेव्हा…! ‘हा’ व्हिडीओ एकदा बघाच
आता उर्फीने एक ट्विट केले आहे त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे. उर्फीने ट्विट करत लिहिले की, जर भाजपात प्रवेश केला तर चित्रा वाघ यांच्याशी मैत्री होईल. चित्रा वाघजी तुम्हाला संजय राठोड आठवत आहेत का? त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तर तुमची चांगली मैत्री झाली. तुम्ही त्यांच्या सर्व चुका खुप लवकर विसरुन गेल्या, असे उर्फीने ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.
2024 च्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून कर्जत-जामखेड मध्ये लागली एक लाखाची पैज!