फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी उर्फी जावेद सोशल मीडियावरील पोस्ट्स मुळे कायम चर्चेत असते. सध्या उर्फी जावेद एका वेगळ्याच कारणाने चांगलीच चर्चेत आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता तर थेट पत्रकार परीषद घेत चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी उर्फीला (Urfi Jawed) सुनावले आहे.
टी-20 संघातून विराट-रोहित कायमचे बाहेर?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असला नंगानाच खपवून घेणार नाही. असा इशारा त्यांनी उर्फी जावेदला दिला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “एखादी बाई भरदिवसा रस्त्यावर उघडी फिरते, नगण्य कपडे घालून अंगप्रदर्शन करते हे किती योग्य आहे? मुंबईमध्ये (Mumbai) भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला नंगानाच करत आहे.”
‘वेड’ चित्रपटाने ६ दिवसात जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
दरम्यान, चित्रा वाघ यांनी यावेळी एका घटनेचा संदर्भ दिला आहे. मागील काही दिवसांपासून एक महिला त्यांना सतत मेसेज करत होती. त्या महिलेला वाघ यांच्याशी महत्त्वाचे बोलायचे होते. मात्र, एक दिवस त्या महिलेने चित्रा वाघ यांना एक व्हिडिओ पाठवला. ज्यामध्ये एक मुलगी अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचे प्रदर्शन करताना दिसली. याबाबत त्या महिलेला विचारले असता, ती म्हणाली की माझी मुलगी उर्फी जावेदमुळे या सगळ्याची बळी झाली आहे. यामुळे चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात भूमिका घेतली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.