राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ( NCP) जनजागर यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या आर्थिक धोरणावरून टीका केली आहे. राज्यातील सामान्य माणसापुढे सध्या महागाईचे मोठे संकट उभे आहे. माणसाच्या डोक्यावर महागाईचं ओझं वाढण्यामागे सरकारचे आर्थिक धोरण आहे, असे शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटले आहे.
तसेच राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. राज्यातील तरुणांना नोकऱ्या नाहीत. यावर सरकार कोणत्याही उपाययोजना किंवा धोरणे आखत नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. याची झळ सामान्य माणसाला बसत असून आजकाल तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. हातात नोकरी नसल्याने राज्यातील तरुणांना व त्यांच्या पालकांना लग्नासाठी नवरी शोधण्यासाठी चपला झिजवाव्या लागत आहेत.
उर्वशी रौतेला ऋषभला भेटायला रुग्णालयात?
याविषयावर या कार्यक्रमात शरद पवारांनी आपले मत व्यक्त करत राज्यातील तरुणांच्या या अवस्थेला शिंदे- फडणवीस सरकार जबाबदार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय लोकांचे मत वळवण्यासाठी राज्यकर्त्यांकडून दोन जातींमध्ये आणि दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. जातीचा व धर्माचा वापर करून राजकारण केले जात असल्याचा आरोप शरद पवारांनी यावेळी शिंदे- फडणवीस ( Shinde-Fadanvis) सरकारवर केला आहे.