लोक भक्तीभावाने व आपापल्या ऐपतीनुसार देवाला दान अर्पण करत असतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर देवस्थानात देखील भाविकांकडून मोठया प्रमाणात दान करण्यात येते. यामध्ये पैशांसोबतच सोने-चांदी देखील दान करण्यात येते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला येतात व दान करतात. दरम्यान या मंदिरात करण्यात आलेल्या दानाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उर्वशी रौतेला ऋषभला भेटायला रुग्णालयात?
पंढरपूरच्या ( Pandhrpur) विठ्ठलाला दान करण्यात आलेल्या एकूण सोन्या चांदीच्या दागिन्यांपैकी पोतेभर दागिने बनावट असल्याचे समोर आले आहे. मंदिर प्रशासनाने दानपेटीतील दागिन्यांची मोजदाद केल्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. मंदिरातील दानपेटीत एकूण 31 किलो सोने व 1050 किलो चांदी जमा झाली आहे.
मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षी जमा झालेल्या सोन्याच्या दागिन्यांपासून सोन्याच्या विटा तयार करण्यात येणार आहेत. दरम्यान बनावट दागिन्यांमुळे सराफांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही ग्राहकाने दागिने ( Fake Ornaments) घेताना पावती घेणे गरजेचे आहे.