सम्मेद शिखरस्थळ मंदिराला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी झारखंड सरकारला हा निर्णय मागे घेण्याबाबत सांगितले आहे. दरम्यान देशातील जैन ( Jain) धर्मियांकडून देखील झारखंड सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला जात आहे. इतकंच नाही तर त्यासाठी ते देशभरात आंदोलने सुद्धा करत आहेत.
उर्वशी रौतेला ऋषभला भेटायला रुग्णालयात?
झारखंड ( Zarkhand) राज्यात गिरीहीद हा जिल्हा आहे. येथे सम्मेद शिखरस्थळ हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे. या निर्णयासंदर्भात देशभरातील नेते आपली भूमिका मांडताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यामध्ये त्यांनी जैन समुदायाला आपला पुर्णपणे पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. झारखंड सरकारने सम्मेद शिखरस्थळाला पर्यटनस्थळ घोषित करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. सम्मेद शिखरस्थळ पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाले तर तेथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे. त्यामुळे झारखंड सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.