राज्यात राजकीय सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजूनही थांबली नाही. ठाकरे गटातून शिंदे गटाकडे ( Shinde Group) जाणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान नाशिकमधील ठाकरे गटाचे 50 पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.
Raj Thackeray : जैन धर्मियांसाठी राज ठाकरे मैदानात!
विशेष म्हणजे ठाकरे ( Thackeray) गटातून बाहेर पडणाऱ्या लोकांची गळती थांबवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे या महिन्याच्या अखेरीस नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर तयारी करण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र अशातच ठाकरे गटातील 50 पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची माहिती समोर आल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
धक्कादायक! विठ्ठलाला दान केलेल्या दागिन्यांपैकी पोतेभर दागिने निघाले खोटे
यासगळ्याचे परिणाम म्हणून नाशिकच्या अगामी महापालिका निवडणूकांचे चित्र नक्कीच बदलणार आहे. याआधी देखील नाशिकमधील नगर सेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आपली फळी मजबुत करण्याच्या प्रयत्नात असतानाच ठाकरे गटाला हा धक्का बसला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला आहे.
“तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही यासाठी शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार” – शरद पवार