शिवडी न्यायालयाने (Shivdi Court) संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. मेधा सोमय्या (Medha Somayya) यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. खटल्यास राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. आता या प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेकिंग! संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ” न्यायालयासमोर हजर राहू शकलो नाही, याचा मलाही खेद आहे. मी आमच्या वकीलाला सांगितली की लवकरात लवकर न्यायालयात जाऊन विनंती करा की उच्च न्यायालयात एक विषय होता. आणि वाहतूक कोंडी असल्याने मी पोहचू शकलो नाही”.
गौतमी पाटील पुन्हा चर्चेत! भर स्टेजवर नाचताना एका मुलाला केलं किस
आता याप्रकरणावर २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. याबाबत किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, ” शिवडी कोर्टाने #संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले कारण कोर्टात हजर न राहिल्याबद्दल. संजय राऊत यांच्या विरोधात डॉ मेधा किरीट सोमय्या बदनामी प्रकरणी कोर्टाने तक्रारदार मेधा सोमय्या यांचे तासभर जबाब नोंदवले. पुढील सुनावणी 24 जानेवारी”. असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
मोठी बातमी! संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला धक्का