उर्फी जावेदच्या संपत्तीबद्दल वाचून तुम्हाला ही बसेल धक्का; ‘ही’ गोष्ट करून कमावले कोट्यवधी रुपये!

You will be shocked to read about Urfi Javed's wealth; Earned crores of rupees by doing 'this' thing!

मागील काही दिवसांपासून उर्फी जावेद ( Urfi Javed) व चित्रा वाघ ( Chitra wagh) यांच्यातील वाद अगदी शिगेला पोहोचले आहेत. उर्फीच्या अजब फॅशन सेन्स वरून चित्रा वाघ यांनी तिला टोकले आहे. तसेच ‘सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?’ अशी टीका चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर केली आहे. यानंतर या दोघींच्यात ट्विटरवर चांगलेच युद्ध पेटले आहे. मात्र अचानकच प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?

सुप्रिया सुळे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती; म्हणाल्या,” राज्यात सुरू असलेले गलिच्छ…”

उर्फी जावेद ही बिगबॉस ओटीटी ( Bigboss OTT) मुळे लोकांच्या दृष्टिक्षेपात आली होती. ती मुळची उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथील आहे. उर्फीवर तिच्या दोन बहिणी व आईची जबाबदारी आहे. आईवडीलांच्या घरगुती वादाला कंटाळून उर्फीने काही वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती.

गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

तिचे वडील कायम शिवीगाळ व मारहाण करायचे. याला कंटाळून उर्फीने घर सोडले व मुंबईला आली. नंतरच्या काळात तिच्या वडिलांनी देखील दुसरे लग्न केले. त्यामुळे तिच्या बहिणी व आई देखील उर्फी सोबत राहू लागल्या. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी उर्फी सुरुवातीला छोट्या- मोठया भूमिका करत होती. नंतर बिगबॉस ओटीटी मुळे ती प्रकाशात आली व सर्वत्र तिच्या फॅशनची चर्चा झाली.

मोठी बातमी! मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांना झटका

यानंतर मात्र तिची फॅशन हीच तिची ओळख बनली. मीडिया रिपोर्टनुसार सध्या वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी उर्फीची संपत्ती दीडशे कोटींपेक्षा जास्त आहे. इतकच नाही तर उर्फी दर महिन्याला 2 ते 5 मिलियन कमाई करते. सध्या तिच्याकडे सर्व सोयीसुविधा असून मुंबई मधल्या एका आलिशान फ्लॅट मध्ये ती राहते.

“…तेव्हापासून मला संसदेत जाण्याची भीती वाटते”; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना जबरदस्त टोला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *