आफताबला वाजून आलीये थंडी पण कपडे घेण्यासाठी नाहीत पैसे…

Aftab is cold but has no money to buy clothes.

मागील वर्षाच्या अखेरीस दिल्ली येथे एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे शहरातील विविध भागात टाकण्यात आले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तरुणीची हत्या तिचा प्रियकर आफताब पुनावाला यानेच केली होती. आफताब सध्या पोलिसांच्या कोठडीत असून त्याला अजूनही जामीन मिळालेला नाही.

Sujay Vikhe Patil: “…म्हणून सुजय विखे पाटील राजकाणात”

श्रद्धा वालकर व आफताब पुनावाला ( Shraddha Walkar & Aftab Punawala) हे दोघेही दिल्लीमध्ये लिव्ह इन रेलशनशीप मध्ये राहत होते. मे 2022 मध्ये आफताबने श्रद्धाची हत्या केली. यानंतर तब्बल सहा महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आले होते. या खुनाची आफताबने पोलिसांकडे कबुली दिली असून त्याची नार्को टेस्ट झालेली आहे. याबाबत पोलीस आणखी तपास करत आहेत. परंतु कोठडीत असणारा आफताब दिल्लीमधील थंडीने हैराण झाला आहे.

रश्मी ठाकरे यांनी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले; ‘या’ मनसे नेत्याचा गंभीर आरोप

पुरेसे कपडे नसल्याने आफताबला थंडीचा त्रास होत असून गरम कपडे खरेदी करण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे. मात्र, आफताबचे डेबिट व क्रेडिट कार्ड पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान कोर्टाने आफताबची कोठडी चार दिवसांनी वाढवली असून 10 जानेवारी रोजी त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Pune: पुणे येथील काही खासगी आयटी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची फसवणूक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *