रितेश आणि जेनेलियाचा वेड हा चित्रपट प्रेक्षकांना वेड लावत आहे. अगदी काहीच दिवसांत या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) याने प्रथमच दिग्दर्शक म्हणून काम केले आहे तर जेनेलिया डिसूझा हिने मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदा पाऊल टाकले आहे. या चित्रपटातील अजय-अतुल यांची गाणी व इतर कलाकारांचा अभिनय देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
“मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवड जनतेतून व्हावी”, अजित पवार यांची मागणी
दिग्गज अभिनेते अशोक सराफ ( Ashok Saraf) यांनी या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान रितेश देशमुखने अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. अशोक सराफ यांच्यासोबत काम करता येणं हे प्रत्येक कलाकारचं स्वप्न असतं. खूप वर्षांनी का होईना पण ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने रितेशचे ते स्वप्न पूर्ण झाले आहे.
मोठी बातमी! मुंबईत बॉम्बस्फोट होईल, पोलीस कंट्रोलला धमकी देणारा फोन
” अशोक मामांसारख्या महानायकासोबत काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य आहे. गेली अनेक वर्षे मी या क्षणाची वाट पाहत होतो. अखेर दोन दशकांनी मला ती संधी मिळाली. वेड या चित्रपटात मी त्यांच्याबरोबर कामही करतोय आणि त्याचे दिग्दर्शनही करतोय यापेक्षा आनंदाची दुसरी कोणती गोष्ट असू शकत नाही.” असे रितेश देशमुख यावेळी म्हणाला आहे. तसेच याआधी देखील अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त रितेशने एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या होत्या.