नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांचा चुकीचा उल्लेख केला. यामुळे भाजप नेते त्यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झालेले दिसून येत आहेत. याआधी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेले वक्तव्य त्यापाठोपाठ आता सावित्रीबाई फुले यांचा चुकीचा उल्लेख! यामुळे अजित पवार ( Ajit Pawar) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
एका भाषणात अजित पवार यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ म्हणण्याऐवजी ‘ क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख केला. यावरून भाजप- राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. दरम्यान भाजपच्या ( BJP) अध्यात्मिक आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांना सुनावले आहे.
“वाचाळवीर अजित पवारांनी याआधी संभाजी महाराजांच्या मुद्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या. आता त्यांनी पुन्हा क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा अपमान केला आहे. यावेळी तरी ते माफी मागणार की, मग्रूरपणे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार ? असा प्रश्न तुषार भोसले यांनी उपस्थित केला आहे. यावर उत्तर देताना आमदार अमोल मिटकरी यांनी तुषार भोसले यांना “शाडीग्राम नावाच्या माकडाने दिवसा गांजा ओढायला सुरुवात केलीय. त्यांच्या पंथाबाबत आम्ही लवकरच सांगणार आहोत. सध्या त्याला कुठलाही धंदा नसल्याने तो नेहमीच अजित पवार यांच्यावर बोलत असतो.” अशा शब्दात बोल लावले आहेत.