रोहित पवारांची क्रिकेट असोसिएशनमध्ये धमाकेदार एन्ट्री; अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Rohit Pawar's explosive entry in Cricket Association; Elected unopposed to the post of President

कर्जत जामखेडचे आमदार व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या पदावर ते बिनविरोध निवडून आले आहेत. पुणे येथील गहूंजे स्टेडियमवर क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यत्वाची निवडणूक मध्यंतरी पार पडली होती.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र? शरद पवार-देवेंद्र फडणवीस यांचा एकाच गाडीतून प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

या निवडणूकीमध्ये रोहित पवार ( Rohit Pawar) क्लब गटाकडून विजयी झाले होते. यामुळे महाराष्ट्र असोसिएशनच्या ( Maharashtra Association) 16 सदस्यांच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली होती.

‘या’ व्यक्तीने विकत घेतला तब्बल २० कोटींचा कुत्रा; वाचा सविस्तर

यानंतर आज महाराष्ट्र असोसिएशनच्या सदस्यांच्या बैठकीमध्ये रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यामुळे युवा तडफदार नेतृत्व म्हणून रोहित पवार यांना आणखी एक संधी व नवीन ओळख मिळाली आहे.

“एक-दोन उद्योग गेल्याने महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही” राज ठाकरे यांच्या या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

रोहित पवार यांनी शरद पवारांच्या पाऊलावर पाऊल ठेवले आहे. असे अनेकदा म्हंटले जाते आणि ते खरे देखील आहे. कारण शरद पवार यांनी देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीसाठी कंबर कसली होती. मात्र त्यांना त्यावेळी भाजपच्या आशिष शेलार यांच्यासोबत युती करायला लागली होती.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र? शरद पवार-देवेंद्र फडणवीस यांचा एकाच गाडीतून प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *