निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता पुढील दोन दिवसांत पुण्याची हवा धोकादायक पातळीवर तर मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात थंडीने ( cold in Maharashtra) जोर धरल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
IND vs SL: क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमी, भारताचे ‘हे’ 3 मोठे खेळाडू एकत्र खेळणार
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. यामुळे राज्यात थंडी वाढलेली आहे. याचाच परिणाम म्हणून पुणे व मुंबई शहराच्या प्रदूषणात ( Pollution in Pune & Mumbai) वाढ झाली आहे. अतिथंडीने प्रदूषणांचे धूलिकण वाढून हवेची गुणवत्ता खलावली आहे.
रोहित पवारांची क्रिकेट असोसिएशनमध्ये धमाकेदार एन्ट्री; अध्यक्षपदी बिनविरोध निवड
यामुळे भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेअंतर्गत असलेल्या ‘सफर’ प्रणालीकडून आलेल्या हवेच्या निर्देशांक अंदाजात, पुणे व मुंबई ही दोन्ही शहरे अनुक्रमे धोकादायक व अतिधोकादायक पातळीवर राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस अशी परिस्थिती असणार आहे.
‘या’ व्यक्तीने विकत घेतला तब्बल २० कोटींचा कुत्रा; वाचा सविस्तर
याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यामुळे थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे प्रकार होऊ शकतात. यामुळे नागरिकांनी अतिश्रमाची कामे टाळावीत. तसेच खोकला व श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित औषधे घ्यावीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्थमा असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
ते दिवसा गांजा ओढून बोलतात! अजित पवारांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी-भाजप मध्ये वाद