पिपंरी चिंचवडमध्ये (Pipnri Chinchwad) 18 वे जागतिक मराठी संमेलन भरवण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे यांची मुलाखत झाली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. तसेच त्यांनी नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना शोभत नाही असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काल राज ठाकरेंनी ही टीका केली असतानाच आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौऱ्यावरून भाजपवर सडकवून टीका केली आहे.
‘केजीएफ’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रॉकी भाईच्या बड्डेला चाहत्यांना मोठं गिफ्ट!
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी भाजपवर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केलाय. त्यांच्या या वक्तव्याने चर्चाना उधाण आले आहे.
निसर्गाचा समतोल बिघडला! मुंबई व पुण्याला पुढील दोन दिवस सावधानतेचा इशारा; प्रदूषणात झाली वाढ
त्याचबरोबर प्रकाश महाजन यांनी शिंदे-फडणवीस सरकारला देखील इशारा दिलाय. ते म्हणाले की, ” नवीन सरकार आल्यानंतर सर्व लोक शिवतीर्थवर येतायेत. मात्र या सरकारला वाटत नाही का राज ठाकरेंवर असलेल्या खोट्या केस मागे घ्याव्यात. जर केसेस मागे घेतल्या नाही तर या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून देवू, असा गंभीर इशारा त्यांनी दिलाय.
IND vs SL: क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमी, भारताचे ‘हे’ 3 मोठे खेळाडू एकत्र खेळणार