‘या’ गावातील लोक कपडे न घालताच राहतात; 85 वर्षांपासून आहे परंपरा!

The people of 'this' village live without clothes; 85 years of tradition!

उर्फी जावेद तोकडे कपडे घालते म्हणून राज्यात सध्या गोंधळ सुरू आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का ? जगात असेही एक गाव आहे, जिथे लोक कधीच कपडे घालत नाहीत. (Villagres Without Cloths) मागील 85 वर्षांपासून या गावातील लोक कपडे घालत नाहीत. विशेष म्हणजे या लोकांकडे मोठी संपत्ती देखील आहे. त्यामुळे गरिबी असल्याने कपडे घालत नसल्याचा मुद्दा येथे येत नाही. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे या गावातील लोक सुशिक्षित आहेत.

‘केजीएफ’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रॉकी भाईच्या बड्डेला चाहत्यांना मोठं गिफ्ट!

यूकेच्या हर्टफोर्डशायरमध्ये स्पीलप्लॅट्झ गावातील हे लोक आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या गावात पब, स्विमिंग पूल, क्लबची देखील व्यवस्था आहे. इतकंच नाही तर हे गाव पाहण्यासाठी येणाऱ्यांनाही देखील इथे कपडे न घालता फिरावे लागते. मात्र, गावातील कोणाला शहरात किंवा इतर ठिकाणी सामान आणण्यासाठी जायचे असेल तर ते लोक कपडे घालून जाऊ शकतात. मात्र गावात परतताना त्यांना कपडे न घालताच यावे लागते.

ब्रेकिंग! राज ठाकरेंचा अयोधा दौरा रद्द करण्यामागे भाजपचा हात; ‘या’ मनसे नेत्याचा दावा

थंडीच्या दिवसांत या लोकांना कपडे घालण्याचे स्वातंत्र्य ( Freedom for wearing cloths) असते. याशिवाय इतर कोणत्याही कारणास्तव कोणाला कपडे घालायची इच्छा असेल तर ते कपडे घालू शकतात. येथील लोक एकमेकांमध्ये असे मिसळले आहेत की, त्यांना कपडे न घालता वावरताना काहीही त्रास होत नाही. अनेक संघटनांनी या गावातील लोकांच्या कपडे न घालण्यावर विरोध दर्शविला. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही.

निसर्गाचा समतोल बिघडला! मुंबई व पुण्याला पुढील दोन दिवस सावधानतेचा इशारा; प्रदूषणात झाली वाढ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *