एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यांनतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यांनतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आरोप, प्रत्यारोपाला चालूच आहेत ते काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं जातंय.
नाद करा पण आमचा कुठं! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिसेनेसोबत बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एका व्यासपीठावर कधीच दिसले नाहीत. मात्र आता ते लवकरच ते एका व्यासपीठावर दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असणार आहेत. त्यामुळे शिंदे, फडणवीस, आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळताना तरुणाची ३२ लाखांची फसवणूक
येत्या 23 तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, उद्ध ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहाणार का नाही याबाबतअजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण होणार असल्याने उद्धव ठाकरे उपस्थित राहतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे, फडणवीस, आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
‘या’ गावातील लोक कपडे न घालताच राहतात; 85 वर्षांपासून आहे परंपरा!