काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची ( Bharat Jodo Yatra) संपूर्ण देशात चर्चा होत आहे. या यात्रेत राहुल गांधींनी वयोवृध्द लोकांच्यात मिसळण्यापासून ते लहान मुलांशी गप्पा मारण्यापर्यंत विविध गोष्टी केल्या आहेत. संपूर्ण भारत जोडो यात्रेत राहुल गांधी कुठलाही बडेजावपणा न ठेवता सामान्य लोकांच्यात वावरत होते. इतकच नाही तर या यात्रेत त्यांनी आपला वेश देखील अगदी साधाच ठेवला होता. या यात्रेत राहुल गांधी ( Rahul Gandhi) लोकांना फक्त पांढऱ्या टी-शर्ट मध्ये दिसले. आता नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की राहुल गांधींनी त्यांच्या पांढऱ्या टीशर्टखाली घातलंय काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सौर पंपासाठी मिळणार 90 टक्के अनुदान
मागच्या काही दिवसापूर्वीच हरियाणाचे कृषिमंत्री जेपी दलाल (JP Dalal) यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील टी-शर्ट वरून टीका केली होते. आता राहुल गांधींचा टी-शर्ट पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधी शर्टच्या आतमध्ये थर्मल घालतात, हे नेटकऱ्यांनी फोटोंवरुन उघड केलं आहे. याबाबत एक ट्विट देखील करण्यात आले आहे.
So it’s final. He feels cold too. See the thermal below his beard and his buttoned up T Shirt.
— Himanshu Jain (@HemanNamo) January 7, 2023
This is clear case of creating fraud narrative and getting unnecessary publicity. These photos are from internet and can be verified. pic.twitter.com/3aptwvxL9z
शरद पवार–देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र गाडीतील प्रवासाबाबत राऊतांच मोठं विधान; म्हणाले…
हिमांशू जैन या ट्विटवर अकाऊंटवरून राहुल गांधींचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये राहुल गांधी यांनी शर्टच्या आतमध्ये थर्मल घातलेले स्पष्टपणे दिसत आहे. आता या फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.