रविवारी सेनेगलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन बसचा अपघात होऊन ४० जण जागीच ठार झाले असून ८७ जण गंभीर जखमी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बसमध्ये (Bus) मिळून १२५ प्रवासी होते. त्यामध्ये ४० मरण पावले. रविवारी पहाटे ३.१५ वाजता राष्ट्रीय मार्ग क्रमांक १ वर हा अपघात झाला आहे.
राहुल गांधी टी-शर्टच्या आतमध्ये थर्मल घालतात; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
या दोन्ही बसपैकी एका बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे बस अनियंत्रित होऊन दुसऱ्या बसवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला असून ८७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सौर पंपासाठी मिळणार 90 टक्के अनुदान
या अपघातामुळे सेनेगलमध्ये तीन दिवसांचा दुखवटा पाळला जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष मॅकी सॅल (President McKee Sall) यांनी देशामध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
शरद पवार–देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र गाडीतील प्रवासाबाबत राऊतांच मोठं विधान; म्हणाले…