बहुचर्चित ‘वेड’ या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक सराफ यांची भूमिका देखील प्रचंड गाजली आहे. नुकताच त्यांचा 75 वा वाढदिवस झाला. यानिमित्त पुण्यात अशोक सराफ ( Ashok Saraf) यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी कलाकारांच्या प्रतिभा जपल्या जात नसल्याची खंत बोलून दाखवली आहे.
“मेरी डीपी इतनी ढासू चित्रा मेरी सासू”; उर्फी जावेदचे ट्विट चर्चेत
कार्यक्रमा दरम्यान ते म्हणाले की, “प्रसिध्द कलाकार प्रशांत दामले यांनी आजपर्यंत साडेबारा हजार प्रयोग केले. अशोक सराफ यांनी सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्म सोडला तर नाटक, चित्रपट, सिरीअल या ठिकाणी काम केले आहे. मागील अनेक वर्षे हे कलाकार काम करत आहेत. मात्र आपल्याकडे त्यांना ‘कलावंत आहेत’ इथपर्यंतच ठेवले जाते. हेच अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज ते मुख्यमंत्री असते.”
दौंडमध्ये १० ते १५ जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन
परदेशात गेल्याशिवाय कलाकाराचं महत्त्व काय असतं हे कळत नाही. रोमसारख्या देशात ‘लिओवार्दी द विंची’ सारख्या कलाकारांच्या नावाने विमानतळ आहेत. मात्र आपल्याकडे कलाकारांच्या नावाने फार फार तर चौक असतात. आपल्या इथे कलाकारांच्या प्रतिमा जपल्या जातात. मात्र कलाकारांच्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. कलाकार आपल्या देशात नसते तर अराजकता निर्माण झाली असती. तसेच आपल्या येथे मोठ्या माणसांचा सत्कार करायला मोठी माणसं राहिलेली नाहीत. त्यामुळं आमच्यासारख्यांवर आटोपाव आटोपावं लागते. असे म्हणत राज ठाकरे यांनी कलाकारांच्या सन्मानाबाबत शोकांतिका
व्यक्त केली आहे.
ड्रॅगन फ्रुट या परदेशी फळाची शेती करा आणि कमवा लाखो रुपये; सरकार देखील देते अनुदान