कर्जत जामखेडचे आमदार व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या पदावर ते बिनविरोध निवडून आले आहेत. पुणे येथील गहूंजे स्टेडियमवर क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यत्वाची निवडणूक मध्यंतरी पार पडली होती. यावर अनेकजण रोहित पवार यांचे अभिनंद करत आहेत. तर राम शिंदे यांनी ही धक्कादायक निवड असल्याचं बोललं आहे.
एक लाख रुपये भरून जामीन मिळाला मात्र कोचर दाम्पत्याची आजची रात्र कारागारगृहातच
राम शिंदे म्हणाले, क्रिकेटच्या परंपरेला धोका पोहचविणारी आणि नुकसान करणारी ही निवड आहे. अलीकडे राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये टोकाची राजकीय स्पर्धा वाढलेली पाहायला मिळत आहे.
मोठी बातमी! कोयता गॅंगला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दरम्यान, काल महाराष्ट्र असोसिएशनच्या सदस्यांच्या बैठकीमध्ये रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यामुळे युवा तडफदार नेतृत्व म्हणून रोहित पवार यांना आणखी एक संधी व नवीन ओळख मिळाली आहे.
“…तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते”; राज ठाकरे यांनी केला मोठा खुलासा