इंदुरीकर महाराजांच्या सासूचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला मोठा धक्का!

Mother-in-law of Indurikar Maharaj joins BJP; A big blow to the leader of the Congress!

सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्या किर्तनाची सगळीकडे प्रचंड चर्चा होत असते. दरम्यान, मध्यंतरी इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार या सरपंच झाल्याची माहिती समोर आली होती. संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावातील ग्रामपंचायत निवडणूकित अपक्ष उमेदवारी दाखल करत त्यांनी हा विजय मिळवला होता. मात्र, नुकताच त्यांनी भाजपामध्ये ( BJP) प्रवेश केला आहे.

रोहित पवारांची निवड परंपरेला नुकसान करणारी – राम शिंदे

निळवंडे येथील सरपंच शशिकला पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सुरुवातीच्या काळात त्या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या. परंतु, गावाच्या विकासासाठी त्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. निळवंडे येथील ग्रामपंचायत निवडणूक होताच, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe- Patil) आणि कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे ग्रामपंचायतीत आमची सत्ता आहे. असा दावा केला होता.

Rohit Sharma: रोहित शर्मानं टी20 क्रिकेट सोडायचा निर्णय घेतला?

यानंतर शशिकला पवार (Shashikala Pawar) यांनी दोन्ही नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवत गावच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवल्याचे स्पष्ट केले होते. या दोन्ही नेत्यांच्या सहकार्याने गावातील समस्या सोडवू अशी भूमिका शशिकला पवार यांनी यावेळी घेतली होती. परंतु काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांनी सहकार्य न केल्याने शशिकला पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने बाळासाहेब थोरात यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

एक लाख रुपये भरून जामीन मिळाला मात्र कोचर दाम्पत्याची आजची रात्र कारागारगृहातच

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *