पुण्यामध्ये (Pune) दिल्लीवरून उपचार घ्यायला आलेल्या महिलेवर पिस्तुलच्या धाकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार केली असून हडपसर पोलिसांनी आरोपी संजय भोसले ( रा. उरुळी कांचन, पुणे-सोलापूर) अटक केली आहे.
हिरव्या मतांसाठी उद्धव ठाकरे गप्प आहेत; आशिष शेलार यांचा हल्लाबोल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील ( Delhi) गाझियाबाद शहरातील 39 वर्षीय महिला पुण्यातील उरुळी कांचन परिसरातील निसर्गोपचार केंद्रात उपचारासाठी आली होती. या महिलेला मणक्याचे विकार असल्याने निसर्गोपचार केंद्रात उपचार घ्यायचे होते.
लग्नासाठी नवरी शोधा म्हणून शेतकरी पुत्राने केला थेट आमदारांना फोन!
उपचारासाठी भरपूर दिवस लागणार असल्याने या महिलेकडून उरुळी कांचन परिसरात भाडेतत्त्वावर खोली मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान आरोपी संजय भोसले याच्याशी तिची ओळख झाली. भोसले यांनी 5 जानेवारीला रूम दाखवण्याच्या बहाण्याने हडपसर भागात नेले.
एक वक्तव्य आणि नितीश कुमार परत अडकले; म्हणाले, “आम्ही पुरुष रोज लैंगिक संबंध ठेवतो परंतु,..”
यावेळी महिलेवर धाक दाखवून भोसले यांनी बलात्कार केला. तसेच या घटनेची माहिती इतर कोणाला दिल्यास जीवे मारू अशी धमकी देखील त्या महिलेला देण्यात आली. मात्र घाबरलेल्या महिलेने पोलिसांची मदत घेत तक्रार दिली व आरोपी संजय भोसलेला अटक करण्यात आली.
शिवसेनेतून बाहेर पडणं सोप्प न्हवतं; गिरीश महाजन यांची कबुली! मिशन फेल होईल याचीही वाटली होती भीती…