मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे (Chitra Navathe) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चित्रा नवाथे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
उर्फी जावेदमुळे चित्रा वाघ अडचणीत; आचारसंहिता भंग केल्याचा आरोप!
चित्रा नवाथे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये देखील काम केले. त्यांनी पहिल्यांदाच ‘लाखाची गोष्ट’ (Lakhachi Gosht) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.
अपघातानंतर बच्चू कडू यांनी स्वतःच दिली तब्येतीबाबत माहिती; म्हणाले, “माझी प्रकृती ठीक असुन…”
गुळाचा गणपती, बोलविता धनी, वहिनीच्या बांगड्या, मोहित्यांची मंजुळा, बोक्या सातबंडे,अगडबम, उमज पडेल तर, राम राम पाव्हणं अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी चित्रपटासोबत नाटकांमध्ये देखील चांगले काम केले आहे.
मोठी बातमी! अखेर राखी सावंत अडकली लग्नबंधनात? अचानक लग्न करण्यामागे काय असेल कारण?