‘ही’ आहे देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस; दिवसाला देते तब्बल 38.8 लिटर दुध!

'It' is the highest milking buffalo in the country; Gives a whopping 38.8 liters of milk a day!

शेतकरी अधिकचे आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीसोबत पशुपालन व्यवसाय करत असतात. यासाठी गायी-म्हैशी यांचे संगोपन केले जाते. हरियाणा ( Hariyana) मधील अश्याच एका पशुपालकाची म्हैस सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कैथलच्या बुधा खेडा गावातील ही म्हैस देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस म्हणून ओळखली जात आहे. सर्वाधिक दूध (Milk) देण्याचा विक्रम या ‘रेश्मा’ नामक म्हैशीने केला असून यासाठी सरकारने पुरस्कार देखील दिला आहे.

“यांना गुंतवणुकीपेक्षा पंतप्रधानांचे राजकीय कार्यक्रम महत्त्वाचे आहेत”; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

इतकंच नाही तर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने ( NDDB) या म्हैशीवर 33.8 लिटर दूध देण्याचा विक्रम नोंदवला आहे. 2022 मध्ये रेश्मा चौथ्यांदा आई झाली तेव्हा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने तिला सर्वाधिक दूध देणाऱ्या म्हशीचे प्रमाणपत्रही दिले. तिच्या दुधाची फॅट गुणवत्ता 10 पैकी 9.31 आहे. सुरुवातीला ती दररोज 19 ते 20 लिटर दुध देत होती. नंतर मात्र दररोज 38.8 लिटर दूध देत आहे.

उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार

हरियाणा राज्यातील कैथल येथील बुधा खेडा गावातील संदीप, नरेश आणि राजेश ही तीन भावंडे या म्हैशीचे मालक आहेत. त्यांच्याकडे फक्त तीन म्हैशी असून त्यापैकी रेश्मा अधिक दूध देते. यासाठी तिला दररोज 20 किलो पशुखाद्य द्यावे लागते. यासोबतच हिरवा चारा देखील दिला जातो. आजपर्यंत रेश्मा पाच वेळा आई झाली आहे. परंतु, तिची दूध देण्याची क्षमता अजूनही जास्त आहे. तिची मुले सुद्धा जास्त भावाने विकली जातात.

महाराष्ट्रातील ‘या’ गावात शेतीला बांधच नाहीत; सगळीकडे रंगलीय जोरदार चर्चा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *