
आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा अपघात झाला आहे. हा अपघात अमरावतीमध्ये झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. डोक्याबरोबर आमदार बच्चू कडू यांचा अपघातामध्ये उजव्या पायाला देखील दुखापत झाली आहे. बच्चू कडू रस्ता ओलंडताना हा अपघात झाला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बच्चू कडू यांना लवकर बरं वाटावं यासाठी आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे.
धक्कादायक! पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटून अग्नितांडव
उस्मानाबाद मधील प्रहार संघटनेने बच्चू कडू यांना लवकर बरे वाटावे यासाठी आई तुळजाभवानीला साकडे घातले आहे. त्याचबरोबर तुळजाभवानी देवीची आरती देखील केली आहे.
जगातील पहिले रोबोट कॅफे! कॉफी पासून स्नॅक्स पर्यंत रोबोटच बनवून हातात देणार…
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला इजा झाली आहे.