आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले,”स्वतःला विकलं तेव्हढं पुरे, मुंबई विकू नका…”

Aditya Thackeray attacked Chief Minister Eknath Shinde; Said, "Sell yourself enough, don't sell Mumbai..."

एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) बंडखोरी करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. यांनतर सत्ताधारी आणि विरोधक रोज एकमेकांवर आरोप करत असल्याचे दिसत आहे. यामध्येच आता आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मोठी बातमी! तारक मेहता मधील ‘या’ अभिनेत्याचे निधन

सरकार मुंबई महापालिकेची (Mumbai Municipality) लूट करत आहे. सरकारने काढलेल्या रस्त्याच्या टेंडला कोणीही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आता नवं टेंडर काढण्यात आले आहे. ४०० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ६०८० कोटी रूपयांचं टेंडर काढण्यात आले आहे.यामुळे मुंबईमधील सिमेंट-कॉंक्रिटच्या (Cement-concrete) रस्ते कंत्राटात घोटाळा झाला आहे असे आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर केले आहेत. ते पत्रकार परिषदेत (Press conference) बोलत होते.

मुंबई महापालिकेमध्ये कोटींचा घोटाळा; आदित्य ठाकरे यांचे शिंदे सरकारवर गंभीर आरोप

आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईतीमधील (Mumbai ) कामाचा कालावधी हा १ ऑक्टोबर (Octobar) ते ३१ मे (May) असतो. कारण नंतर पावसाळा ऋतू (rainy season) चालू होतो. मात्र पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतात. मुंबईतीमधील कामे कशी करतात हेच मुख्यमंत्र्यांना माहिती नाही. महापालिकेमध्ये कोणती बॉडी आणि महापौर नसताना प्रशासकाने (administrator) या कामांना मंजुरी कशी दिली? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मला देखील स्वतःला संपवू वाटले होते; संजय दत्तने उलगडले कर्करोगाच्या प्रवासाचे किस्से

त्याचबरोबर आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, हे सरकार आता बिल्डर, कॉन्टॅक्टरर झालंय. स्वतःला विकलं तेव्हढं पुरे, माझी मुंबई विकू नका, मुंबईचं ATM करू नका हे माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

शेतकरी बापाने पाच एकर जमीन विकली, पण पोरांन करून दाखविलं; महाराष्ट्र केसरी मध्ये मिळवले सुवर्णपदक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *